#Dussehra2020 दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी गर्दी, वाहनांची खरेदी वाढल्याने बाजारात उत्साह
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मान्यवरांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात दसऱ्याचा सण साजरा केला जात आहे. त्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यावर बंधने आली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे हे महापर्व प्रत्येकाच्या जीवनात एक नवी प्रेरणा घेऊन येईल असे त्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.