Fish Market Crowd | मालवणमध्ये मासे खरेदीसाठी समुद्रावर तोबा गर्दी, गर्दी करत नियमांचं उल्लंघन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनंत चतुर्दशी झाल्यावर सिंधुदुर्गवासियांनी माशांवर ताव मारण्यासाठी मालवण समुद्र किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी मासे खरेदीसाठी मालवण समुद्र किनाऱ्यावर आलेल्या खवय्यांनी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक पातळीवर सुरु आहे, अश्यात मासे खरेदीसाठी केलेल्या गर्दीने सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजलेत. स्थानिक प्रशासनाचा दुर्लक्ष, कोरोनाला निमंत्रण देणारी गर्दी मालवण समुद्र किनाऱ्यावर मासे खवय्यांनी केली आहे.