Manmad | चित्रपटगृहातच फोडले फटाके, सलमान खानच्या चाहत्यांचा प्रताप,अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालेगाव शहराताल सेंट्रल चित्रपटगृहात सलमान खानचा चित्रपट सुरू असतांना त्याच्या चाहत्यांनी थेट चित्रपट गृहात फटाके फोडल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली आणि त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता.अखेर काल फटाके फोडणाऱ्यांविरोधात चित्रपटगृह मालकाने पोलिसात काल तक्रार केली. मालेगाव मध्ये सलमान खान,शाहरुख खान,अमिताभ बच्चन अशा अभिनेत्यांचे चाहते असून त्यांचा नवीन चित्रपट आला की त्यांचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असतात आणि त्याची पडद्यावर एन्ट्री होताच काही उत्साही चाहते मात्र थेट फटाके फोडून आनंद व्यक्त करीत असतात.यापूर्वी सलमान खानच्या ट्युबलाईट हा सिनेमा प्रर्दशित झाल्यानंतरदेखील असाच प्रकार घडला होता.