कोरोनामुळे परिस्थिती बिकट,700 गाईगुरांची उपासमार, मुक्या जीवांना मदतीची गरज, या ठिकाणी मदत करा!
महामार्गावरील;गावातील मोकाट गुरे;गुरांची बेकायदा वाहतूक यानंतर या गुरांच्या होत असलेला संगोपनाचा प्रश्न या साऱ्या गोस्टी लक्षांत घेउन हरिभक्त परायण कोकरे यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी लोटे येथे गोवंसच्या संगोपनाचा श्री संत न्यानेश्वर माउली मुक्तीधाम सेवा संथानाच्या माध्यामातून निर्णय घेतला.दोन चार गुरांच्या माध्यमातून गोवंसच्या संगोपनाला सुरुवात केली.यानंतर गुरांची दिवसेंदिवस संख्या वाढत गेली.हि संख्या शेकडापर्यत पोहचली.आता या गोशाळेत सुमारे ७०० गुरे आहेत.गोवंसच्या संगोपणासाठी या शाळेत सुमारे १८ कर्मचारी काम करीत आहेत.गुरांच्या संगोपनासह येथील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन खर्चाची जबाबदारी गेली काही वर्षे कोकरे लीलया पार पाडत आहेत.तर या गोशाळेत अनेक गावातील गुरे ज्यानां स्वतःहा गुरांचे पालनपोषण करता येत नाही अशी गुरे या गोशाळेत सोडली जातात.