Covid Vaccine | लस मोफत मिळणार! सरकारी रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयात 250₹ लसीची किंमत
Continues below advertisement
नवी दिल्ली : उद्यापासून देशभर कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना लसीकरण करण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील. 1 मार्चपासून देशात 60 वर्षांपेक्षा जास्त व 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना लस देण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाची लस सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाणार आहे.
Continues below advertisement