Nagpur Covid Screening Van | नागपुरात अत्याधुनिक कोविड स्क्रीनिंग व्हॅनचं लोकार्पण
नागपुरात दारोदारी जाऊन स्वॅब घेऊ शकेल अशा अत्याधुनिक कोविड स्क्रीनिंग व्हॅनचे लोकार्पण झाले. गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात बऱ्याच कोव्हिडसेफ व्हॅन्स बनवण्यात आल्या. पण ही अशी व्हॅन आहे ज्यामध्ये सर्व
अभ्यास करून मग त्यातील छोट्या मोठ्या त्रुटी बनवत असताना दूर करण्यात आल्या आहेत. या व्हॅनच्या आत असणाऱ्या हेपा फिल्टरने हवेचे प्रत्येक पार्टीक्युलेट स्वच्छ राहते तर पॉझिटीव्ह प्रेशर आत हवेतील किटाणू येऊ
देत नाही. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्येही दारो-दारी सुरक्षितरित्या जाऊन स्वॅब घेता येतील आणि लोकांना ही त्यामुळे टेस्टसाठी बाहेर पडावं लागणार नाही.