गुहागरच्या हेदवी येथे सेल्फीच्या नादात पती-पत्नी बुडाले, बामणघळ येथील घळीत पडून दोघांचा मृत्यू

रत्नागिरीत सेल्फी घेण्याच्या नादात पती-पत्नीला जीव गमावाला लागलाय. गुहागरमधील हेदवी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. अनंत माणगावकर  आणि सुचेना माणगावकर अशी मृतांची नावं आहेत. हेदवी येथील 'बामणघळ' या ठिकाणी हे दोघं आलं होते. त्यावेळी सुचेना माणगावकर सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडल्या. बायकोला वाचवायला गेलेले अनंत माणगावकर हे देखील तोल जाऊन खाली पडले. यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola