चेंबूर, टिळक नगर, बोरिवली,मुलुंड आणि अंधेरीत कोरोनाच्या संख्येत वाढ,घरोघरी जाऊन स्क्रिनिंगला सुरुवात
Continues below advertisement
मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागलाय. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी मुंबईकरांनी नियमांचं पालन करणं गरजेचं झालंय. असं असतानाही अनेकजण कोरोना गेला अशा आविर्भावात वावरताय. अशाच बेजबाबदार मुंबईकरांना पालिकेनं दणका दिलाय. मुंबईत मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात पालिकेने कारवाई आणखी तीव्र केलीय.. मुंबईत मास्क न वापरणाऱ्या तब्बल 13 हजार जणांवर पालिकेनं केलीय. या कारवाईतून पालिकेनं तब्बल 25 लाखांचा दंड वसूल केलाय. तर लोकल प्रवासात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. लोकलमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिका विशेष मार्शल नेमण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement
Tags :
Pravina Morajkar Covid Test Corona Maharashtra Corona Test Corona In Maharashtra Corona Death Corona Covid 19