#Coronavirus | येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
पुणे : राज्यात कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच उद्यापासून तीन ठिकाणी टेस्टिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Continues below advertisement
Tags :
Pimpri Chinchwad Corona Maharashtra Pune Mumbai Rajesh Tope Health Minister Corona Virus Corona Covid 19