Amit Thackeray | कोरोना योद्ध्यांसाठी अमित ठाकरेंकडून मदतीचा हात; 1000 पीपीई किट्स, मास्कची मदत
संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच देशाला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी पैशांच्या स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपातील मदत जाहीर केली आहे. अशातच राज्यातील कोरोना फायटर्स म्हणजेच, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पीपीई किट्सचा राज्यात तुटवडा आहे. हिच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 1000 पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेला केली आहे. त्यानंतर मार्डच्या वतीने अमित ठाकरे यांचे आभारही मानले आहेत.