Corona Update India | गेल्या 24 तासात देशभरात 16 हजार 922 कोरोनाबाधित वाढले
देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले आहेत. तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 57.42 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 86 हजार 514 इतके आहेत. गेल्या 24 तासात 13 हजार 012 रुग्ण बरे झाले झाले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 894 वर पोहोचली आहे.