Konkan Ganesh Utsav | 13 ते 31 ऑगस्टदरम्यान कोकणात एसटीने जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक

१३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19  ची चाचणी  (RT- PCR Swab Test )  करणे अनिवार्य करण्यात आलीय. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यासच संबंधितांना प्रवास करता येईल. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर बसेस आज रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड - 19  ची चाचणी पॉझिटिव्ह  (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola