Solapur Kiran Lohar : सोलापूरचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Continues below advertisement

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.  25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं आहे. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतलं आहे. याच किरण लोहार यांनी डिसले गुरुजींवर काही आरोप केले होते. त्यानंतर डिसले गुरुजींनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram