G 23 नेत्यांचं सुपारी घेऊन Congress विरोधात काम, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप : ABP Majha
पाच राज्यांतल्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील कलह वाढलाय. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या जी २३ गटाच्या नेत्यांची बैठक आज रात्री कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी होणार आहे. राहुल गांधी यांनी पक्षापासून काही काळ पूर्ण बाजूला व्हावं अशी या गटाची मागणी असल्याचं कळंतय. पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधींनी उतरू न दिल्यानंही जी-२३ गटानं खंत व्यक्त केलेय. महाराष्ट्रातून या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. मुकुल वासनिकही या गटाचे सदस्य होते मात्र त्यांना पक्षांतर्गत रचनेत समाविष्ट केल्यानं ते या बैठकांपासून दूर असल्याची चर्चा आहे.