Malegaon : सरकारी रूग्णालयात गोंधळ,नातेवाईकांकडून तोडफोड ABP MAJHA
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात काल रात्रीच्या सुमारास एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातलाय. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केलीये. तसंच रुग्णालयातील कुंड्यांचीही तोडफोड केलीये. काल रात्रीच्या सुमारास हे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना जास्त वेळ थांबू नका, असं सांगितलं. मात्र, या क्षुल्लक कारणावरुन नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान गोंधळ घालणाऱ्या तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.