भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा, बेहिशेबी संपत्तीचा आरोप
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.
Tags :
Chitra Wagh Complaint. Chitra Wagh Property Chitra Wagh Case Kishor Wagh Property Kishor Wagh Chitra Wagh BJP