Konkan Ganesh Utsav | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन बंधनकारक?

कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करायचा निर्णय घेतला सिंधुदुर्गातील बहुतांश ग्रामपंचायतींने घेतला आहे. उशीरा येणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यां वरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये वाद रंगलेला पाहायला मिळतो, तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे कोकणात गणपतीला येऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. कोरोनाच्या काळात 7 ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola