Cotton Farming | यवतमाळच्या परवेज पठाण यांनी केली पिवळ्या आणि कत्था रंगाच्या कापसाची लागवड
Continues below advertisement
संपूर्ण पश्चिम विदर्भात जास्तीत जास्त शेतकरी कपाशीची लागवड करतात परंतु पाहिजे त्याप्रमाणे पांढऱ्या सोन्याला भाव मिळत नाही.त्यात कपाशीवर येणारी अळी आणि त्यांचे नियंत्रण तसेच फवारणी, खत यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन खर्च वाढला आहे मात्र उत्पन्न मध्ये फार बदल झाला नाही त्यात योग्य भाव मिळतं नसल्याने शेती करणे कठीण होवून गेले आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या 6 एकर शेतात काही प्रमाणात शेतकऱ्यांने रंगीत कपाशीची लागवड केली त्यामुळे हा रंगीत कापूस शेतकऱ्यांचे जीवनमान बदलू शकले अशी आशा निर्माण झाली आहे.
Continues below advertisement