मुंबईत चालकरहित मेट्रो, मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए च्या मेट्रो डब्यांचं मुख्यमंत्र्यांकडून अनावरण
मुंबई : नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट मुंबईकरांना मिळालं आहे. चारकोप मेट्रो डेपो येथे मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए च्या मेट्रो गाड्यांच्या डब्यांचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. नवी मेट्रो लवकरच रुळांवरुन मेट्रो 7 आणि मेट्रो 2 A या लाईन येत्या मे पर्यंत जनतेसाठी सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण 576 कोचेस टप्प्याटप्प्यानं बंगळुरुहून मुंबईत दाखल होणार आहेत. यापैकी पहिले चार कोच काल मुंबईत दाखल झाले. याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.