Bhandara Hospital Fire | भंडारा आग प्रकरणी चौकशीसाठी समिती, दोषींवर कठोर कारवाई : मुख्यमंत्री ठाकरे

Continues below advertisement
भंडारा : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगदळे यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram