Uddhav Thackeray | मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही, आमचं मंत्रिमंडळ जनतेशी बांधिल : मुख्यमंत्री
नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात सांगितलं. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.
Tags :
Uddhav Thackeray LIVE Nagpur Adhiveshan Nagpur Winter Session Maharashtra Farmer Devendra Fadnavis Maha Vikas Aghadi CM Uddhav Thackeray