#JanataCurfew मुख्यमंत्री जनता कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊत यांचे संकेत
कोरोना व्हायरसचं जाळं पसरत पसरत अखेर मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार आज देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुंबईकरांनी या कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला आहे, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री हा कर्फ्यू वाढवण्याची शक्यता आहे असंही त्यांनी म्हटलं.