Thackeray Family Corona Checkup | 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'चं पथक मातोश्रीवर, संपूर्ण ठाकरे कुटुंबाची तपासणी
चेस दी व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Tags :
Covid 19 Death New Corona Patients Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19