CM Eknath Shinde | मराठी भाषेसाठी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा - मंत्र्यांना सूचना
कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. महायुतीत मिठाचा खळा पडेल अशी वक्तव्य करू नये असे सांगितले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रतिउत्तर देण्यास सांगितले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. मराठी भाषेसाठी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.