मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत न्हावा शेवा टप्पा-3 पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत न्हावा शेवा टप्पा- ३ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोरोना संबंधी सर्व नियमांचं पालन झाल्याचं दिसलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील असे काही मोजकेच मंत्री मंचावर दिसले तर इतर नेते आणि अधिकारी विशिष्ट अंतर ठेवून कार्यक्रमाला उपस्थित होता. या कार्यक्रमाला पुष्पगुच्छांऐवजी सॅनिटायझर देऊन स्वागत केल्यानं मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं कौतुक केलं.