पुण्यातील हवेली तालुक्यातील शिंदवणे घाटात ढगफुटी, घरांची पडझड, सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे
Continues below advertisement
उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करुन देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणाऱ्या ओढ्याला पुर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला. अनेक घरांमध्य पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमधे घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं.
Continues below advertisement