PM Modi | देशात अनलॉक 1 सुरू झाल्यापासून नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांशी आज संवाद साधला. देशात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरिक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.