गलवान खोऱ्यातील झटापटीची चीनकडून कबुली, फक्त 4 सैनिक मारले गेल्याचा चीनचा कांगावा

नवी दिल्ली : भारत आणि चीन (India China Face Off ) अशा दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमावादावरुन अनेकदा खटके उडत असतात. या परिस्थितीमध्ये सातत्यानं दोन्ही देशांतील सैन्यदलांमध्ये शांततापूर्ण चर्चाही सुरुच आहेत. याच चर्चासत्रांदरम्यान आता चीनच्या माध्यमांकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. लडाखच्या पूर्व भागात असणाऱ्या गलवान खोऱ्यात साधारण 8 महिन्यांपूर्वी भारत आणि चीन या दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यामध्ये चीनकडून मृत सैनिकांचा अधिकृत आकडा मात्र समोर येऊ दिला नव्हता. पण, आता मात्र पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये चीननं नेमकं किती सैनिकांना गमावलं होतं हे स्पष्ट होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola