तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं, तैवानच्या वायुदलाने विमान पाडल्याचा संशय
नवी दिल्ली : तैवानमध्ये चीनचं सुखोई विमान कोसळलं आहे. तैवानच्या वायुदलानं चीनचं सुखोई-35 विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचं विमान घुसल्यानं विमान पाडण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच चीनचं विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.