Chief Minister Basavaraj Bommai :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य : Abp Majha

Continues below advertisement

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यभरात आणि सीमाभागात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बंगळुरातील घटना ही लहान-सहान आहे, त्यावरुन सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शुक्रवारी रात्री  बंगळुरु येथे घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. अशा लहान सहान गोष्टीवरून दगडफेक करणे, सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत गृहमंत्र्यांना सांगितले आहे. पुतळ्याची विटंबना करणे हे देशभक्तांचे काम नव्हे. महापुरुषांचे पुतळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उभारलेले असतात."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram