Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी छ.संभाजीनगरमधील तरुणानं जीवन संपवलं : ABP Majha
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या आपतगाव इथल्या 28 वर्षीय गणेश कुबेर या तरुणाने काल आत्महत्या केली होती. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यविधी करु नका असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर कुबेर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सध्या मृतदेह घाटी रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.