Talathi Bharti Exam : संभाजीनगरमधल्या परीक्षार्थीला दिलं अमरावतीचं केंद्र, विद्यार्थ्यांचा आरोप
Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरतीसाठीची परीक्षा तीन टप्प्यात होणार आहे. यासाठी परीक्षार्थीनी निवडलेल्या तीन केंद्रांऐवजी इतरत्र परीक्षा केंद्र दिल्याने तलाठी परीक्षा केंद्र वाटपात गोंधळ झाल्याचं दिसतंय. परीक्षार्थींना परीक्षेसाठी अर्ज करताना महसूल मंडळातील आपल्या जवळच परीक्षा केंद्र मिळेल असा उल्लेख करण्यात आला होता...मात्र संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीचे परीक्षा केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे त्यांनी केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केलीये. याच परीक्षार्थिंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
Continues below advertisement