Chhatrapati Sambhaji Nagar : खोक्यांवरुन संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांच्यात कलगीतुरा

Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) तीनही पक्षाची आज एकत्र सभा होत आहे. विशेष म्हणजे अशाच सभा राज्यभरात होणार असून, पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) होत आहे. या 'वज्रमुठ सभे'ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पॉलिटिकल ड्रामा रंगताना पाहायला मिळत आहे.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola