Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?

Continues below advertisement

Sandipan Bhumre Threat Letter : संभाजीनगरमध्ये व्हायरल होतंय गब्बरचं पत्र, नेमकं प्रकरण काय?

छ.संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या गब्बर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रशासनातील विशेषत: पोलिस प्रशानातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लक्ष्य ठेऊन हा गब्बर पुढे आला असून काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा गब्बर चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. आता, असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आला आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल झालं आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गँग तयार केली असून, लवकरच संभाजीनगर मधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हे भर चौकात करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. तसेच, या पत्रात सूचना देताना माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांना जीवेच मारू, असेही म्हटले आहे. या पत्रामुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram