Sambhajinagar Rada :पायात दुखापत,हवेत गोळीबार, दंगलीची परिस्थिती हाताळणाऱ्या पोलीस अधिकारी Exclusive
Continues below advertisement
संभाजीनगरच्या किराडपुरा परिसरात रामनवमीच्या रात्री मोठा हिंसाचार झाला. सुदैवानं दंगलीचं लोण उर्वरित छ संभाजीनगर शहर किंवा राज्यात पसरलं नाही. मात्र हा योगायोग नव्हता. किराडपुरामधली स्थिती योग्यरित्या हाताळण्यात दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांची मोठी भूमिका होती. डीसीपी अपर्णा गीते आणि पोलीस निरीक्षक गीता बागवडे या दोन अधिकाऱ्यांचं खूप कौतुक होतंय. जमाव राम मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होता. या जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अपेक्षित परिणाम झाला, आणि जमाव शांत होण्यास सुरुवात झाली. त्यांनी जर हवेत गोळीबाराचा निर्णय घेतला नसता, तर काय अनर्थ घडला असता याची कल्पना न केलेलीच बरी. हिंसाचारात डीसीपी गीते यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं. तरीही त्यांनी तेव्हापासून एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही.
Continues below advertisement