Sambhajinagar Phulambri : फुलंब्री पंचायत समितीसमोर सरपंचाचा पैसे उधळतानाचा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर एका तरुणाचा पैसे उधळतानाचा व्हिडीओ समोर आलाय.. मंगेश साबळे असं या पैसे उधळणाऱ्या तरुण सरपंचाचे नाव आहे.. गटविकास अधिकाऱ्यानं विहिर मंजुरीसाठी लाच मागितल्याने संतप्त तरुण सरपंचाने त्यांच्या कार्यालयासमोरच २ लाख रुपयांच्या नोटा उधळल्या..गळ्यात नोटांचा हार घालून पंचायत समितीच्या कार्यालयासमोर पैसे उधळतानाचा सरपंचाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतंय.