Sambhajinagar Lok Sabha Explained : सेना-भाजपच्या वादात पुन्हा MIM? संभाजीनगरमध्ये कुणाची ताकद किती?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajinagar Lok Sabha : सेना-भाजपच्या वादात पुन्हा MIM? संभाजीनगरमध्ये कुणाची ताकद किती?
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : मराठवाड्याची राजधानी, ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आणि औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेलं आधीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर कायम वेगवेगळ्या चळवळींचं केंद्र राहिलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ, मराठा क्रांती मोर्चा अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळी या शहराने पाहिल्यात. त्यामुळे या जिल्ह्यातल्या राजकारणावर सुद्धा त्याचे परिणाम झालेत. मागचे अनेक वर्ष निवडणुकांमध्ये आणि हिंदू मुस्लीम वाद हेच चित्र या जिल्ह्यात दिसलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या मतदारसंघात काय हालचाली सुरुय, महायुती, महाविकास आघाडीकडून कुणाला तिकीट मिळणार? कोण शर्यतीत आहे? मतदार कुणाला साथ देणार?