Sambhajinagar Land Scam : संभाजीनगरमध्ये जमीन आरक्षणात हातचलाखी? भुमरेंचा भूखंडावर डोळा?

Continues below advertisement

Sambhajinagar Land Scam : संभाजीनगरमध्ये जमीन आरक्षणात हातचलाखी? भुमरेंचा भूखंडावर डोळा?

बातमी छत्रपती संभाजीनगरमधील एका जमिनीच्या हेराफेरीची.. आणि त्याचं कनेक्शन आहे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्याशी.. वाळूज MIDCमधील ८ हजार स्वेअर फुटाची मोकळी जागा, हॉस्पिटलसाठी वापरण्यात यावी म्हणून.. पालकमंत्री संदिपान भुमरे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी, उद्योगमंत्री उदय सामंतांंना पत्र लिहिलं होतं.. त्यानंतर यंत्रणेने संबंधित मोकळ्या जागेच्या जागावापरात बदलही केला... मात्र जी जागा हॉस्पिटलसाठी मागितल्या गेल्यावर, त्या जागी उभं झालं वेअरहाऊस... आणि महत्वाचे म्हणजे ... या कंपनीच्या पत्त्यावर संपर्कासाठी जो ई-मेल आयडी देण्यात आला.. तो स्वत: पालकमंत्री संदीपान भुमरेंचा निघाला.. ज्या मंत्र्यांनी ही जागा हॉस्पिटलसाठी वापरावी अशी मागणी केली होती, त्याच मंत्र्यांने जागा मिळताच तिथे स्वतःचेच वेअरहाऊस उभे करण्याचा निर्णय घेतला .... ह्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती.. आज ... हाय कोर्टाने यावर स्थगिती दिलीय.. ऐन निवडणुकीच्या काळात हि स्थगिती विरोधकांंसाठी आयतं कोलीत आहे... दरम्यान मंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून, बेकायदेशीररित्या शासकीय भूखंड हडप केल्याचा आरोप होतोय.. पाहूयात याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram