Sambhajinagar Cash Seized : संभाजीनगरमध्ये पैठणगेट परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी सापडलं मोठं घबाड
Continues below advertisement
Sambhajinagar Cash Seized : संभाजीनगरमध्ये पैठणगेट परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी सापडलं मोठं घबाड
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यापूर्वी ईडी (ED), सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली जात होती. मात्र, निवडणूक काळात पोलिसांच्या (Police) नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणेदरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मतदारांना (Voter) वाटण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात आली आहे. आता, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील पैठण गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त केलीये.
Continues below advertisement