Sambhaji Nagar : मुलगा पाहिजे म्हणत प्राध्यापकाचा तरुणीवर आठ महिने अत्याचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत एका  30 वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला.. नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकानं केलेल्या या कृत्यात त्याची पत्नी देखील सामील असल्याचा आरोप आहे. पदवी शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरोधात यांच्याविरोधात रात्री बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापकाने आपल्या सोबत लग्न करण्याचा आग्रह धरत, धमकी देऊन जून 2022 ते  जानेवारी 2023 या कालावधीत अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola