Sambhaji Nagar Kiradpura Clash : संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा, परिस्थिती नियंत्रणात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या किऱ्हाडपुरा परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असताना रात्री एक वाजता मंदिराबाहेर दोन गटांत वाद सुरू झाला..ज्याची परिणीती दगडफेक आणि जाळपोळीत झाली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत १२ गोळ्या झाडल्या.. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यामध्ये काही पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पोलिस कायदेशीर कारवाई करत आहेत. या घटनेमध्ये राम मंदिराची कुठलीही हानी झालेली नाही. त्यामुळे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन एबीपी माझा करतंय.