Sambhaji Nagar: पतसंस्थेतील ठेव बुडाल्याच्या भीतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने संपवला जीव

Continues below advertisement

Sambhaji Nagar: पतसंस्थेतील ठेव बुडाल्याच्या भीतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने संपवला जीव छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला होता. दरम्यान आता घोटाळ्यात पहिला बळी गेला असून, एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लाडगाव येथे घडलीय. रामेश्वर नारायण इथर असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram