Manoj Jarange Exclusive : सरसकट आरक्षण, अल्टीमेटमची तारीख, जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद?

Continues below advertisement

Manoj Jarange Exclusive : सरसकट आरक्षण, अल्टीमेटमची तारीख, जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद?

मुंबई : जरांगेंनी उपोषण मागे घेतलं खरं, मात्र त्यांच्यात आणि सरकारमध्ये विसंवाद अजूनही कायम आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation Protest) देण्यात आलेली अल्टिमेटमची तारीख आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी. या दोन्ही मुद्द्यांवरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वेगवेगळी माहिती दिल्याचं दिसून येतंय. 

मनोज जरांगे आधीपासून सरसकट मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्याचा पुनरुच्चार त्यांनी आजही अनेकदा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याचं खंडन केलं. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरा विसंवाद आहे मुदतीच्या तारखेवरून. जरांगे यांनी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे तर मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारीची तारीख सांगितली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram