Imtiaz Jaleel on Sambhaji Nagar : औरंगाबाद नामांतराला विरोध, जलील यांचं साखळी उपोषण सुरु
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय.. मात्र या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय..जर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करायचं असेल तर नागपूरचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महानगर करा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केलेय. या नामांतराविरोधात जलील यांनी साखळी उपोषण सुरुच आहे