Imtiaz Jaleel : लाडकी बहीण योजनेतून मिळतंय ते घ्या मतदान MIM ला घ्या

लाडकी बहीण योजनेतून जे काही मिळत आहे ते सर्व काही घ्या, वाटल्यास दिवाळीला पाच हजार रुपये मागा, कारण दिवाळीनंततर दिवाळं निघणार, जलील यांची सरकारवर टोलेबाजी. 


संभाजीनगर -  लाडकी बहीण योजनेतून जे काही मिळत आहे ते सर्व काही घ्या, जे काही मिळत आहे ते घेऊन टाका,सरकार काही त्यांच्या खिशातून देत नाही, पण मतदान एमआयएमच्या पतंगला करा असे वक्तव्य इम्तियाज जलील म्हणाले शिवाय निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे स्कूटरवर फिरणार, फडणवीस कोणाला लेफ्ट मागतील तर अजित पवार यांना पायी पायी चालावं लागेल. कारण त्यांच्या मागे जो तामसाम असतो, 20, 20 गाड्या त्यात डिझेल टाकायला ही सरकारकडे पैसे राहणार नाहीत. कारण तिजोरीला मोठा फटका बसणार आहे आणि त्यामुळे आमच्या जेवढ्या बहिणी आहेत त्यांना मी सांगतो की जे काही लाड करायचे ते करून घ्या. वाटल्यास दिवाळीला पाच हजार रुपये मागा .दिवाळी संपली की दिवाळी निघणार आणि निवडणूक झाली की लाडफाड काही राहणार नाही..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola