Fake Seeds Sting Operation : बोगस बियाणांवर 'माझा'चं स्टिंग ऑपरेशन, पाहा कशी होतेय बळीराजाची लूट

राज्यात बोगस बियाणे आणि वाढीव दराने त्याची विक्री करणाऱ्या लोकांविरोधात धाडसत्र सुरू आहे. मात्र कृषीमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बियाणं घेताना शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे. एबीपी माझानं याबाबत स्टिंग ऑपरेशन केलं, आणि या लुटारू बियाणं विक्रेत्यांचा पर्दाफाश केला. आठशे रुपयांच्या बियाण्यांची पिशवी तब्बल २ हजार ३०० रुपयांना विकली जातेय.. फक्त बियाणेच चढ्या दराने विक्री केली जात नसून, त्यासाठी लागणाऱ्या खताची देखील लिंकिंग सुरू झाली आहे. नापिकी, अतिवृष्टी, अवकाळा पावसासारखी अस्मानी संकटं सतत सुरू असताना, आता विक्रेत्यांकडून होणारी लूट, यानंही शेतकरी पिळून निघतोय. यावर राज्य सरकार कडक कारवाई करणार का, ते पाहावं लागेल. एबीपी माझा या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola