Chhatrapati Sambhajinagar Teachers : शिक्षकांच्या परीक्षेला जेमतेम 1 टक्का शिक्षकांची उपस्थिती
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिक्षकांची परीक्षा घेण्यात आली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या परीक्षेला ९९ टक्के शिक्षकांनी दांडी मारली. जेमतेम १ टक्का शिक्षकांची उपस्थितीतून शिक्षक किती उदासीन आहेत, हे स्पष्ट झालं. मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयाने ही शिक्षकांची परीक्षा घेतली. जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा यासाठी ही परीक्षा होती. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारांवर शिक्षक आहेत. प्रत्यक्षात अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर होते. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा होती. पण या परीक्षेला अनेक शिक्षक संघटनांचा विरोध होता. मराठवाड्यात 23 हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली होती.
Continues below advertisement
Tags :
Exam Teacher Attendance Teacher Exam Chhatrapati Sambhajinagar Sadan Marathwada Divisional Commissioner Office