Chhatrapati Sambhajinagar Rename : छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात 69 हजार आक्षेप अर्ज
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात ६९ हजार आक्षेप अर्ज, तर समर्थनातही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्यास सुरुवात. विभागीय आयुक्त कार्यालयात भरले जाणार अर्ज. त्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नामांतराच्या निर्णयानंतर 27 मार्चपर्यंत आक्षेप आणि हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते, दरम्यान यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नामांतराविरोधात आतापर्यंत 69 हजार आक्षेप विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. तर समर्थनात केवळ साडेचारशे अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात 24 हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाले आहे... केवळ संभाजीनगरच नाही तर राज्यभरातून आक्षेप अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नामकरणाच्या समर्थनार्थही आज उद्या मोठ्या प्रमाणावरती अर्ज दाखल होणार असल्याची माहिती आहे..
Tags :
Support Application Objection Chhatrapati Sambhajinagar Name Change Objection 69 Thousand Objection Application Divisional Commissioners Office Objection Filed