Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरचे उद्योजक खंडणीखोर नेत्यांमुळे हवालदिल
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्राची म्हणून ओळख आहे.. बजाज, स्कोडा, व्हिडिओकॉन सारख्या कंपन्या या शहरात आल्या आणि शहराला नवी ओळख दिली. मात्र या शहरातील उद्योजक काही ठराविक पक्षाच्या नेत्यांमुळे हैराण झाले आहेत. काही ना काही कारण काढून, किंवा खोेटे आरोप करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सतत अवास्तव मागण्या करून उपोषणाचा इशारा द्यायचा, आणि कंपनीत संप नको असेल तर खंडणी द्या अशी मागणी करायची, अशी या राजकीय नेत्यांची मोडस ऑपरेंडी आहे.. या सगळ्याला कंटाळून या उद्योजकांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
Continues below advertisement