Chhatrapati Sambhajinagar : EVM ठेवलेल्या स्ट्राँग रूम संदर्भात प्रश्नांची उत्तर जिल्हाधिकाऱ्यांकडून

Continues below advertisement

छत्रपती संभाजीनगर: राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhaji nagar) मतदानाला सुरुवात होतानाच मोठा अडथळा उभा राहिला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 25 ठिकाणी ईव्हीएम मशीन (EVM) बिघडल्याचा प्रकार समोर आला.

ईव्हीएम मशीन बंद असल्याने सकाळी मतदानाला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अखेर या 25 ठिकाणी नव्या ईव्हीएम मशीन लावून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला.  त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या  रांगा लागल्या होत्या. राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने मतदार सकाळच्या वेळेत मतदान आटोपण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने सकाळच्याच वेळेत मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ होताना दिसली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram